Ladki Bahin Yojana e-KYC
esakal
नाशिक
Ladki Bahin Yojana : E-KYC पूर्ण तरी लाभ मिळत नाही? लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय; योजनेचा लाभ न मिळाल्यास काय करावे?
Maharashtra Government Addresses e-KYC Related Complaints : लाडकी बहीण योजनेतील लाभ न मिळालेल्या महिलांसाठी क्षेत्रीय पडताळणी सुरू असून, ई-केवायसी व कागदपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे.
सटाणा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या तक्रारीची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी (e-KYC Verification) प्रक्रिया पूर्ण करूनही लाभ न मिळाल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत कागदोपत्री चुका, त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींना आता अंगणवाडी सेविकांशी (Anganwadi Worker Role) संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.
