

Nashik News
esakal
नाशिक: गोशाळांमधील देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने 'लाडकी गाय योजना' सुरू केली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून नोंदणीकृत गोशाळेतील गायींना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. तुलनेत संकरित गायींना ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात असल्याने देशी गायींच्या संवर्धनासाठी अनुदानात वाढ करण्याची मागणी गो-पालकांनी केली आहे.