सोबत फोटो:-14792
लखमापूर ः चौफुलीवर रविवारी झालेली वाहतूक कोंडी.
लखमापूर फाट्यावर
सिग्नल बसविण्याची मागणी
दिंडोरी, ता. १५ : तालुक्यातील लखमापूर फाटा येथे रविवारी (ता. १५) सायंकाळी चार ते सहा दोन तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. या चौफुलीवर उड्डाणपूल अथवा सिंगनल बसवण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
लखमापूर फाटा हा वणी-दिंडोरी रोड तसेच पिंपळगाव ते लखमापूरगाव या चौफुलीवर असून, अत्यंत वर्दळीचा व रहदारीचा रस्ता आहे. तसेच नाशिक ते गुजरातकडे, सप्तशृंगगड या ठिकाणांकडे जाणारा मोठा रस्ता असून, या रस्त्यावर कायमस्वरूपी वर्दळ असते. तसेच पिंपळगाव मार्केटसाठीही तालुक्यातील अनेक ठिकाणाहून याच चौफुलीवरून वाहने येतात. त्यामुळे येथे रोजच ट्राफिक जाम होते. रोज अपघात देखील होत असतात. तसेच ट्राफिक जाम झाल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल देखील वेळेवर पोहोचत नाही व इतर वाहनधारकांनाही विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे लखमापूर फाटा येथे सिग्नल बसविण्यात यावा, अशी मागणी होत आहे,
या ठिकाणी एखादे वाहन या चौफुलीवर अडकल्यास वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी उड्डाण पूल अथवा सिंग्नल त्वरित बसवावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.