Tattva Supplements Accused of Drain Encroachment in Nashik : नाशिक विमानतळाजवळील तत्व सप्लिमेंट्स कंपनीने नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण केल्याने पावसाळ्यात शेजारील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. जानोरी ग्रामपंचायतीने दुसऱ्यांदा नोटीस बजावली असून, कारवाईची मागणी केली आहे.
लखमापूर- नाशिक विमानतळासमोरील गट नं.१०९७ मधील तत्त्व सप्लिमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीने शेजारील नैसर्गिक नाल्यात अतिक्रमण करून बांधकाम केल्याने नाला बुजला आहे. त्यामुळे पावसाळ्यात व अतिवृष्टीच्या काळात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होतो.