Head-On Collision Near Chachadgaon Toll Plaza : नाशिक-पेठ महामार्गावरील चाचडगाव टोलनाक्याजवळ झालेला भीषण अपघात. या ठिकाणी ईर्टिगा आणि स्कॉर्पिओच्या धडकेत दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून यात चार प्रवाशांनी आपला जीव गमावला.
लखमापूर/ नाशिक: पेठ महामार्गावरील चाचडगाव टोलनाक्याजवळ आंबेगण शिवारात ईर्टिगा कार आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली.