Nashik News: टाकी बांधून लाखो रुपयांचा चुराडा; 12 वर्षांपासून वापराविना पाण्याची टाकी

A water tank that has been waiting for water for almost twelve years
A water tank that has been waiting for water for almost twelve yearsesakal

Nashik News : प्रभाग ३१ मधील ज्ञानेश्वरनगर भागात १२ वर्षांपूर्वी बांधलेल्या २० दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये आजपर्यंत एक थेंब पाणीदेखील पडले नसून ही टाकी वापराविना तशीच पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सुरवातीला या टाकीचा वापर केला होता असा दावा प्रशासनातर्फे करण्यात येत असला तरीदेखील हे साफ खोटे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे त्यानंतर या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुदाम कोंबडे, वंदना बिरारी, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड आणि संगीता जाधव यांच्यादेखील लक्षात ही बाब आली नाही, हे विशेष.

नाही म्हणायला गत आठवड्यात डेमसे यांनी अधीक्षक अभियंता चव्हाणके यांच्याकडे हा प्रश्न मांडत या टाकीचा उपयोग का केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Lakhs of rupees wasted by building tank Water tank unused for 12 years Nashik News)

तत्कालीन वॉर्ड क्रमांक १०० चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मनोहर बोराडे यांनी त्यांच्या विकास निधीतून २०११ ला या टाकीचे तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. विशेष म्हणजे विक्रमी वेळेत ही टाकी बांधून पूर्ण करण्यात आली होती.

यामुळे वासननगर, ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर, जायभावेनगर, नागरेनगर, मेट्रो झोन, म्हाडा कॉलनी आदी भागात पाणीपुरवठा केला जाईल असे नियोजन होते. यामुळे भवानी माथा येथे असलेल्या टाकीवरचा भार कमी होऊन पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी भागातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा होईल.

मात्र ही टाकी बांधून १२ वर्षानंतरदेखील तिचा प्रत्यक्ष उपयोग न सुरू केल्याने मग ही टाकी बांधून लाखो रुपयांचा अट्टहास का केला, असा सवाल नागरिक आता उपस्थित करत आहेत.

दरम्यान, सध्या या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईमुळे नागरिक हैरान झाले आहेत. अनेक नववसाहतीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनाला आली आहे. असे असताना आहे, त्या सुविधांचा वापर का केला जात नाही याचे नवल आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A water tank that has been waiting for water for almost twelve years
NMC News : शहरात 21 हजार व्यापारी रडारवर; एलबीटी निर्धारण करण्याच्या सूचना

"धरण उशाला आणि कोरड घशाला असेच म्हणावे लागेल. घराशेजारी पाण्याची टाकी असून देखील अनेक वेळा विकत टँकर मागविण्याची वेळ येते विशेषतः उन्हाळ्यात खूप हाल होतात .प्रशासनाने या टाकीचा उपयोग सुरू केला पाहिजे."- उत्तम साबळे, स्थानिक नागरिक

"सुरवातीला या टाकी चा उपयोग करण्यात आला होता .मध्यंतरी पुरेसे स्टोअरेज होत असल्याने ही टाकी भरली जात नव्हती.मात्र सध्या गरज असल्याने पुन्हा एकदा या टाकीचे पाइप वॉश आउट करण्याची प्रोसेस हातात घेतली आहे. ती पूर्ण करून आठ दिवसात या टाकीचा उपयोग पाणी वितरणासाठी करण्यात येणार आहे." - गोकूळ पगारे, उपअभियंता

A water tank that has been waiting for water for almost twelve years
NMC News : सव्वा किलोमीटरच्या मार्गात 250 अतिक्रमणे; अतिक्रमण कारवाई लूटूपूटू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com