Lakshmi Pujan 2023: आदिमाया सप्तशृंगीच्या दरबारात लक्ष्मीपूजन

Evening decorated idol of Adimaya on the occasion of Lakshmi Puja
Evening decorated idol of Adimaya on the occasion of Lakshmi Pujaesakal

वणी : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री महाकाली - महालक्ष्मी व महासरस्वती असे त्रिगुणात्मक स्वरूपिनी असलेल्या सप्तशृंगीमातेच्या दरबारात आज लक्ष्मीपूजन विधीवत झाले. देवीला विविध अलंकारांनी सजविण्यात आले होते. (Lakshmi Pujan 2023 Lakshmi Pujan at Adimaya Saptshringi court nashik)

दीपोत्सवाच्या आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळ सातला आदिमायेच्या अलंकाराचे पूजन करून मंदिरात नेण्यात आले. लक्ष्मीपूजन व दीपावलीनिमित्त मंदिर गाभाऱ्यात आकाशकंदील व आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.

लक्ष्मीपूजनानिमित्त श्री सप्तशृंगीस लालरंगाचे महावस्त्र नेसवून चांदीचे मुकुट, सोने व डायमंडचे मंगळसूत्र, सोन्याचे पुतळ्याचे गाठले, कोयरी हार, ९ पदरी मेहनमाळ, वज्रटीक, सोन्याची पाऊले, वज्रटिक, कर्णफुले, नथ या सोन्याच्या आभूषणांनी साजशृंगार करण्यात आला होता.

Evening decorated idol of Adimaya on the occasion of Lakshmi Puja
Lakshmi Pujan 2023: इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीत 20 टक्क्यांची वाढ! व्यावसायिकांमध्ये उत्साह

दरम्यान रात्री आठला ट्रस्टच्या कार्यालयात आदिमायेच्या सोन्या चांदीच्या सर्व अलंकाराचे पुरोहितांच्या मंत्रघोषात ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांचे हस्ते पूजन करण्यात आले.

न्यासाचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, कार्यालयीन प्रमुख प्रकाश जोशी आदीसह ट्रस्टचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. लक्ष्मीपुजना निमित्त दिवसभरात सुमारे वीस हजार भाविकांनी आदिमायेचे दर्शन घेतले.

Evening decorated idol of Adimaya on the occasion of Lakshmi Puja
Lakshmi Pujan 2023: लक्ष्मीपूजनाने दीपोत्सवात अवतरले चैतन्य! घराघरांत, व्यवसाय, उद्योगांत मुहूर्तावर लक्ष्मीपूजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com