दोन कॉलम बातमी
----
बनावट कागदपत्रांच्या आधारे
लाटली कोट्यवधीची जमीन
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : मेहरुण परिसरातील जमिनीसंदर्भात बनावट कागदपत्रे व खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महसुली जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुमनबाई रघुनाथ पाटील (वय ७६, रा. नामदेवनगर, इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ फेब्रुवारी ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत व्यंकटेश कॉलनी, मेहरुण, जळगाव येथील (सर्व्हे नं.४७२/१/पै/प्लॉट क्र.०२) मधील (४८३.०९ चौरस मीटर) जागा बळकावण्यासाठी संशयितांनी कटकारस्थान रचून संशयित वनिता कैलास पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) आणि ममता प्रदीप पाटील (वय ३४, रा.बऱ्हाणपूर रोड, रावेर) यांनी इतर साथीदारांच्या मदतीने नमूद जमिनीचे बनावट व खोटे कागदपत्र तयार केले. खोटे दस्तऐवज खरे असेल्याचे भासवून संशयितांनी फिर्यादीसह शासनाची दिशाभूल व फसवणूक करून ही जागा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नावावर करून घेतल्याप्रकरणी तक्रार दिल्यावरुन वनिता कैलास पाटील, ममता प्रदीप पाटील व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक अशोक काळे तपास करीत आहेत.