सेवा संकल्प अंतर्गत वनहक्क दावेदारांना उतारे

सेवा संकल्प अंतर्गत वनहक्क दावेदारांना उतारे
Published on: 
फोटो : 31492 कळवण : सेवा संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सातबारा उतारा व ८-अ उताऱ्यांच्या नोंदी वितरित करताना सहायक जिल्हाधिकारी डॉ. काश्‍मिरा संखे. ... सेवा संकल्प अंतर्गत वनहक्क दावेदारांना उतारे --- सहायक जिल्हाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांच्या हस्ते कळवण येथे वितरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत वनहक्क दावेदारांना सातबारा उतारा व ८-अ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी तथा कळवणच्या प्रकल्प अधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांच्या हस्ते पात्र वनहक्क दावेदारांना या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. वनहक्क दावेदारांना त्यांच्या हक्कासंदर्भातील महसुली अभिलेख उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. वनहक्क दावेदारांना त्यांच्या हक्कांचे अभिलेख उपलब्ध करून देण्याबरोबरच वनहक्क कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी रमेश वाघ, सहायक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे, तालुका वनहक्क व्यवस्थापक भरत पगार आणि तालुका व्यवस्थापक तुषार बंगाळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com