नाशिक-सुरत महामार्गासाठी जमीन हस्तांतरण सुरु

highway
highwayGoogle


नाशिक : गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मंजुरी मिळालेल्या केंद्राच्या ग्रीनफिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार, चेन्नई- सुरत ग्रीनफिल्ड सहा पदरी सुरत ते चेन्नई महामार्गाच्या भूहस्तांतरणाला सुरवात झाली आहे. त्यानुसार या मार्गाचे 1,600 अंतरावरून 1,250 किलोमीटरवर येणार आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार असल्याने नाशिक- सुरतदरम्यानचे अंतर अवघे 176 किलोमीटरवर येणार आहे. (Land transfer for Nashik Surat greenfield corridor highway is started nashik)


भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ची बैठक झाली. उपमहाप्रबंधक एम. एस. कुमार अध्यक्षस्थानी होते. आर. के. पांडे, महाबीर सिंग, मनोज कुमार, श्रीमान अलोक, एस. एस. सांधू आदी उपस्थित होते. बैठकीत महामार्ग सादरीकरणासह सहा पदरीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर जमिनी हस्तांतरणाला सुरवात झाली आहे. हा महामार्ग पूर्णत्वास आल्यानंतर नाशिक ते सुरत या दोन मुख्य शहरांमधील अंतर कमी होणार आहे. हा मार्ग ग्रीनफिल्ड अंतर्गत सुरत- नाशिक- नगर- कर्माळा- सोलापूर- कर्नल- कडप्पा- चेन्नई असा तयार करण्यात येणार आहे. यामुळे दोन मुख्य शहरांना जोडणाऱ्या या मार्गातील अंतर 350 किलोमीटरने कमी होणार असून, सहा पदरीकरणामुळे वेळेची बचत होणार आहे.


दरम्यान, हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून 176 किलोमीटर अंतर कापणार आहे. सुरगाणा- पेठ- दिंडोरी- नाशिक- निफाड- सिन्नर या सहा तालुक्यांतून हा महामार्ग जाणार आहे. जवळपास 122 किलोमीटर महामार्ग जिल्ह्यातून जाणार असून, 69 गावांपासून जाणार आहे. नव्याने होणारा महामार्ग महत्त्वाकांक्षी असणार आहे. सुरगाणा, पेठ व दिंडोरी या तालुक्यांमधील वन विभागाच्या जमीन हस्तांतरण झाले आहे. लवकरच महामार्ग अस्तित्वात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

highway
PHOTO : नाशिक जिल्ह्यात वसलयं राज्यातील पहिले 'गुलाबी गाव'!


सुरत- चेन्नई : 1,250 किलोमीटर, वेळ : 10 तास
नाशिक- सुरत : 176 किलोमीटर, वेळ : 2 तास
नाशिक- चेन्नई : 8 तास

(Land transfer for Nashik Surat greenfield corridor highway is started nashik)

highway
14 महिन्यांत नाशिक अमरधाममध्ये जळाली 5 हजार टन लाकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com