नाशिक- खुर्जल मळ्यात पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप चोरून नेला. उमेश प्रकाश क्षीरसागर (५२, रा. छायासागर, हडपसर, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची टायझर कार (एमएच- १२- एक्सई- ००८६) खुर्जल मळ्यातील गॅलॅक्सी स्कूलजवळ असलेल्या पार्क केली होती. शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने कारच्या उजव्या बाजूची काच फोडून ३० हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.