Navratri Festival 2022 : गंगाघाटावर मोठ्या संख्येने टिपऱ्या विक्रेते दाखल

Dandiya seller
Dandiya selleresakal
Updated on

नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवाला येत्या २६ तारखेपासून आरंभ होत आहे. कोरोना संकट दूर झाल्याने आता जागोजागी टिपऱ्या, रास-गरब्याची धूम रंगणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गंगाघाटावर धुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने टपऱ्या विक्रेते दाखल झाले आहेत. (large number of vendors came on Ganga Ghat for selling dandiya Navratri Festival 2022 nashik Latest Marathi News)

कोरोना संकट दूर झाल्याने यंदा टिपऱ्यांसह दांडिया रास- गरब्याचे आयोजन विविध मंडळांनी केले आहे. त्यासाठी धुळे जिल्ह्यातून टिपऱ्या विक्रेते मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले असून, दसऱ्यापर्यंत त्यांचा मुक्काम येथेच राहणार आहे. रेशमाच्या काड्यांपासून या टिपऱ्या बनविल्या जातात. यासाठी हे लोक शेतकऱ्यांकडून घाऊक दरात रेशमाच्या काड्या खरेदी करतात. सध्या या विक्रेत्यांकडे सफेद, पिवळी व चमकीच्या टिपऱ्या उपलब्ध आहेत.

सफेद टिपऱ्यांचा भाव सहाशे रुपये शेकडा, तर पिवळ्या टिपऱ्यांचा भाव सातशे रुपये शेकडा आहे. याशिवाय चमकी लावलेल्या टिपऱ्याही विक्रीस ठेवण्यात आल्या असून, त्यांची तेराशे रुपये शेकडा दराने विक्री सुरू आहे. इंधनाच्या दरांत वाढ झाल्याने आता टिपऱ्या नाशिकमध्ये घेऊन येण्यासाठी एका ट्रकला पंधरा ते अठरा हजार रुपये मोजावे लागतात.

Dandiya seller
भगवती मूर्ती संवर्धन कामाची 8 वर्षांनी परिपूर्ती; निघाला 1800 किलो शेंदूर

याशिवाय रंग, चमकीच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शंभरच्या एका बंडलमागे अवघी दहा ते वीस रुपये कमाई होते. त्यातून इतक्या जणांचे कुटुंब जगवायचे कसे, असा प्रश्‍न विक्रेता शरीफ बहाद्दर भोसले याने उपस्थित केला.

टिपऱ्या बनविण्यासाठी लागणाऱ्या रेशमाच्या काड्यांच्या दरांतही वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या मागील तीन पिढ्यांपासून या व्यवसायात असल्याचेही त्याने सांगितले. एरवी हे लोक गंगाघाटावर उघड्यावर टिपऱ्या तयार करतात, परंतु यंदा पाऊस लांबल्याने त्यांचा मुक्काम गणेशवाडीतील भाजी मंडईत आहे.

Dandiya seller
Engineers Day : अभियंत्याचे दैवत भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com