

Lasalgaon Nagar Parishad
esakal
लासलगाव: लासलगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक, ब्राम्हणगाव व निमगाव वाकडा ही गावे एकत्र करून लासलगाव नगरपरिषद निर्माण व्हावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. नगरपरिषद झाल्यास मोठी शासकीय यंत्रणा उपलब्ध होऊन विविध योजनांसाठी अधिक निधी मिळेल आणि लासलगावच्या विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.