Lasalgaon News : नायलॉन मांजाच्या हल्ल्यात तरुणाच्या चेहऱ्यावर २१ टाके; बंदी केवळ कागदावरच!

Banned Nylon Manja Causes Serious Injury in Lasalgaon : लासलगाव शहरात नायलॉन मांजाच्या वापरामुळे दुचाकीवरून जात असलेले ३० वर्षीय तरुण अक्षय सुरेशचंद्र नहाटा यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना २१ टाके पडले आहेत.
Nylon Manja

Nylon Manja

sakal 

Updated on

लासलगाव: उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातलेली असतानाही लासलगाव शहरात ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या नायलॉन मांजामुळे ३० वर्षीय तरुण अक्षय सुरेशचंद्र नहाटा यांच्या चेहऱ्यावर तब्बल २१ टाके पडले असून, गंभीर जखमी झाल्याची घटना लासलगाव येथे घडली आहे. शहरात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू असताना पोलिस यंत्रणा नेमकी कोणती भूमिका बजावत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दत्त मंदिराजवळून दुचाकीवरून जात असताना धारदार नायलॉन मांजा अक्षय नहाटा यांच्या दोन्ही ओठांच्या मधोमध तोंडाजवळ अडकला. हा मांजा अत्यंत धारदार असल्याने काही क्षणांतच त्यांचा चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यांना तत्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती सध्या स्थिर आहे. न्यायालयीन आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असताना पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप नागरिक व कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. लासलगाव शहरात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापर खुलेआम सुरू असतानाही पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिक जखमी होत असताना व पक्षी मृत्यूमुखी पडत असताना प्रशासन नेमके काय करत आहे, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडत असताना प्रशासनाने तातडीने विशेष मोहिमा राबवून नायलॉन मांजाची विक्री थांबवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अक्षय नहाटा हे नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाले असून, तोंडाजवळ २१ टाके पडले आहेत. पतंगप्रेमींनी मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. मात्र, नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन करतो.

- डॉ. योगेश चांडक, लासलगाव

पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे अनेक नागरिकांना गंभीर दुखापती झालेल्या घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी लासलगाव ग्रामपंचायतीकडून घातक मांजावर बंदी घातलेली आहे. बंदी असलेला मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

- रामनाथ शेजवळ, उपसरपंच, लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com