Lasalgaon Onion Market
sakal
लासलगाव: भारताच्या कांदा निर्यातीवर यंदा दुहेरी संकट ओढावले आहे. बांगलादेश आणि सौदी अरब यांसारख्या पारंपरिक खरेदीदार देशांनी भारतीय कांद्याकडे पाठ फिरविली असून, पाकिस्तानच्या स्वस्त कांद्याला प्राधान्य दिले आहे. परिणामी, चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते डिसेंबर २५) कांदा निर्यातीत २२ टक्क्यांची मोठी घट नोंदवण्यात आली आहे.