लासलगाव- केंद्र सरकारने घसरणाऱ्या कांदा दरावर नियंत्रणासाठी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या सरकारी संस्थांच्या माध्यमातून तीन लाख टन कांदा खरेदीचे नियोजन सुरू केले आहे. मात्र, केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेला कांदा खरेदी दर प्रतिक्विंटल १४३५ रुपये हा सध्या बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा तब्बल २०० ते ३०० रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.