Lasalgaon onion market
sakal
लासलगाव: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या १५ दिवसांत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात सुमारे ६०० रुपयांची, तर अवघ्या १५ दिवसांत तब्बल एक हजार रुपयांची घसरण नोंदविली गेली. या दर घसरणीमुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.