लासलगाव- केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असताना, या प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती खरेदी प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवणार आहे.