Lasalgaon student
sakal
लासलगाव: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, येथील अर्जुन जयदत्त होळकर हा विद्यार्थी तेथे अडकून पडला होता. मात्र पालकांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर तो आज सुखरूप मायदेशी परतला. त्यामुळे होळकर कुटुंबीयांसह लासलगाव परिसरातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.