फोटो : 35332
नंदुरबार : लतेश मकवाना यांचा सत्कार करताना प्राचार्या प्रा. वैशाली डी. शेवाळे, प्रा. तेजल पवार, प्रा. किशोर राठी.
--------------
लतेश मकवाना यांची
राज्य स्पर्धेसाठी निवड
नंदुरबार, ता. १८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत नंदुरबार तालुका विधायक समितीच्या एनटीव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा पदवीपूर्व विद्यार्थी लतेश मकवाना यांनी उल्लेखनीय यश मिळवले. मानवविद्या, भाषा व ललित कला या विभागात तो द्वितीय आला. या यशामुळे त्यांची राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली.
लतेश यांनी ‘बोलकी भिंत’ या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पारंपरिक भित्तिचित्रांचे दस्तऐवजीकरण, स्थानिक कला व संस्कृतीचे जतन तसेच सांस्कृतिक वारशाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या संकल्पनेला विद्यापीठस्तरावर विशेष दाद मिळाली. यासाठी त्यांना प्रा. तेजल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. किशोर राठी यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सचिव बी. के. पाटील, संस्थेचे समन्वयक डॉ. एम . एस. रघुवंशी आणि प्रा. वैशाली शेवाळे यांनी लतेशचे अभिनंदन केले.