समाजमन : सकारात्मक, संघटित युवाशक्तीचे बळ

युवाशक्तीमध्ये नवचेतना निर्माण करणे हा देशाच्या नेतृत्वाचा प्रयत्न हा खरोखरच आपल्या देशाला विश्व नेतृत्वाकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच योग्य आहे.
Youth Empowering Youth
Youth Empowering Youthesakal

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव नुकताच झाला. जगाच्या पाठीवर युवकांचा देश असलेल्या भारतातील या युवाशक्तीचा विधायक उपयोग करून भारत बलशाली राष्ट्र नक्कीच बनू शकतो. युवाशक्तीसाठी असे उपक्रम नियमितपणे राबविले गेले पाहिजे.

त्या माध्यमातून युवक आपले ज्ञान कौशल्य अथवा कलागुण दाखविण्यामध्ये व्यस्त राहतील. समाज व राष्ट्र उभारणीसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल.

युवाशक्तीमध्ये नवचेतना निर्माण करणे हा देशाच्या नेतृत्वाचा प्रयत्न हा खरोखरच आपल्या देशाला विश्व नेतृत्वाकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच योग्य आहे. (latest marathi article by adv nitin thackeray on force of positive organized youth nashik news)

काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक नगरीमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले गेले.

यामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण गटांमध्ये विजेतेपद मिळाले. जगाच्या पाठीवर आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, ही सर्वांत मोठी ताकद आहे. या शक्तीला योग्य दिशा दाखविली गेली पाहिजे.

सध्याच्या काळात सरकारकडून, तसेच सकारात्मक प्रयत्नही केले जात आहे. युवकांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना एकत्रितरीत्या आणण्याचे काम हे अतिशय योग्य प्रकारे युवा महोत्सवाच्या माध्यमातून केले गेले.

यानिमित्त संपूर्ण देशातून आलेल्या युवकांनी आपापली कला सादर केली. खरंतर युवाशक्तीसाठी असे उपक्रम नियमितपणे राबविले गेले पाहिजे. त्या माध्यमातून युवक आपले ज्ञान कौशल्य अथवा कलागुण दाखविण्यामध्ये व्यस्त राहतील.

समाज व राष्ट्र उभारणीसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल. युवाशक्तीमध्ये नवचेतना निर्माण करणे हा देशाच्या नेतृत्वाचा प्रयत्न हा खरोखरच आपल्या देशाला विश्व नेतृत्वाकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच योग्य आहे.

आजच्या तरुणाईत प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे. कलात्मकता आणि सर्जनशीलताही आहे. शिक्षणापासून विज्ञान-तंत्रज्ञान, कला, क्रीडा, समाजसेवा व राजकारणातही तरुण पिढी यशाला गवसणी घालू पाहते आहे.

तुमच्याकडून घडणाऱ्या उत्तम कार्यासाठी गरज आहे, ती दृष्टिकोन बदलण्याची. ‘विचार बदला जीवन बदलेल’, हे सूत्र आजच्या पिढीने लक्षात घ्यायला हवे. बऱ्याचदा आपल्यामध्ये बरंच काही करण्याची क्षमता असते.

योग्य आणि सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. भारत देशात युवाशक्ती मोठ्या प्रमाणात असल्याने विश्वगुरू बनण्याची ताकद देशात आहे. युवा शब्दाला उलट वाचल्यास वायू होतो. युवकांनी वायूसारखे गतिशील असले पाहिजे.

Youth Empowering Youth
Ayodhya: राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला मिळणार चालना; सरकारची होणार इतक्या कोटींची कमाई

मनुष्यबळाची घडवणूक कॉलेजमधून

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर म्हणतात, ‘भारत हा जगात सर्वांत मोठी युवाशक्ती असलेला देश आहे. स्वामी विवेकानंदांनी भारत भविष्यात मोठे वैभव आणि समृद्धी मिळवेल’, असे भाकीत केले होते.

जर आपणास स्वप्न प्रत्यक्षात उतरावयाचे असल्यास शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यवान, ध्येयाने प्रेरित व आदर्श युवा पिढी घडवावी लागेल.

तर आणि तरच विचारवंतांचे, समाजसुधारकांचे स्वप्न पूर्ण होईल.’ खरंतर कोणत्याही देशाची युवाशक्ती ही त्या देशाची खरीखुरी साधनसंपत्ती असते. देशाचे मनुष्यबळ महाविद्यालये आणि विद्यापीठांतून घडले असते.

समाजाचा दृष्टिकोन बदला

समाजाचा तरुण पिढीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपणच बदलवू शकतो. आपल्या विधायक कर्तृत्वाने देशातील श्रीमंती ही तेथे असलेल्या आर्थिक गुणवत्तेवर असते.

मात्र तेथील तरुणांची संख्या किती, यावरदेखील ठरते व सर्वांत तरुण देश कोणता हे ठरवतात. कारण तरुण देश म्हणजे आगामी काही वर्षांत तो विकसित व समृद्ध देश असेल, असे ठरते हे फक्त युवाशक्तीमुळे.

एकीचे बळ समजून घ्या

संघटनेचे महत्त्व तर आपण सर्वजण जाणून असतो. किंबहुना लहानपणापासून बोधकथांच्या माध्यमातून आपल्यावर संस्कार केले जात असतात. कबुतरांची गोष्ट आपल्याला माहीतच असेल. एक शिकारी कबुतरांच्या संपूर्ण थव्यावर जाळे टाकून त्यांना अडकवतो.

त्या वेळी सर्व कबुतरे संपूर्ण ताकदीनिशी एकसाथ उडण्याचा प्रयत्न करतात व त्यात यशस्वी होतात. थोडक्यात काय, तर संघटन, एकी असेल तर असाध्य गोष्टीदेखील आपण मिळून साध्य करू शकतो.

Youth Empowering Youth
Manoj Tiwari : 'अब सिर्फ रामजी की फिल्म चलेगी'! मनोज तिवारी असं का बोलून गेले?

युवाशक्तीनेच स्वप्नपूर्ती...

समाजात आपल्याला कोणकोणते बदल करता येतील, त्याचप्रमाणे नवीन काहीतरी आपण समाजात रुजवावे का? यांसारख्या अनेक प्रश्नांवर आपण चर्चेच्या माध्यमातून एक ठराव करू शकतो. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करून बदल घडवू शकतो. समाजातील तळागाळातील व्यक्तीलादेखील पुढे येता येईल, असा प्रयत्न युवाशक्ती करेल.

आपल्या मनातील विचारांची स्वप्नपूर्ती आपण युवाशक्तीनेच करू शकतो. आजच्या युगामध्ये युवकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. विविध प्रकारचे प्रलोभन दाखवून त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; पण आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर त्यासाठी आपणही काही प्रयत्न केले पाहिजे. योग्य घटकांच्या मागे आपण उभे राहिले पाहिजे.

एका विचाराचाच प्रभाव अनेकांवर

आज विचार आणि कृती यात एकसूत्रता येणे गरजेचे आहे. कारण युवकांचा एक विचार अनेकांवर प्रभाव पाडू शकतो. विचारांची कृती ही अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण करते. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्ष स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

ती तारुण्यातच पूर्ण करून दाखविली. संत ज्ञानेश्वरांनी देखील अगदी कमी वयातच ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. सांगायचे म्हटले तर जगातील सर्व महान कार्य ही तरुणांच्या हातूनच घडले आहेत व घडतदेखील आहेत.

उदाहरण द्यायचे तर आताचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हेही अत्यंत कमी वयातच या पदावर विराजमान झाले. यापुढे देखील आपली युवाशक्ती सकारात्मक व संघटित असेल तर सर्वच क्षेत्रात नक्कीच क्रांती घडवेल.

Youth Empowering Youth
PM Modi in Ayodhya: अखेर प्रभू राम आपल्या घरी परतले, प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील रामलल्लाचे पहिले रूप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com