15 वर्षांपासून एक रुपयाही मानधन घेतले नाही! अनोखी देशसेवा

independence day
independence dayesakal

नाशिक रोड/ डीजीपीनगर : रक्तात असलेली देशसेवा काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लष्करी सेवा देऊन देशसेवा करावी, अशी मनोमन इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. अखेर त्यांनी आपल्या व्यवसायातूनच अनोख्या देशसेवेला प्रारंभ केला.

धीरज कनोजिया यांची अनोखी देशसेवा

उपनगर, मातोश्रीनगर येथे धीरज कनोजिया यांचे लॉँड्रीचे दुकान आहे. त्यांचे वडील रामप्रसाद कनोजिया भारतीय लष्करी विभागात ‘वॉशर मॅन’ म्हणून कार्यरत होते. आर्टिलरी विभागात त्यांनी नोकरी केली. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर पिढीजात व्यवसाय म्हणून त्यांनी मातोश्रीनगर, उपनगर येथे दुकान थाटून मुलांना त्यांच्या पायावर उभे केले. त्यांचा मुलगा धीरज यांनी व्यवसाय सांभाळून कुटुंबाला हातभार लावला. रक्तात असलेली देशसेवा काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लष्करी सेवा देऊन देशसेवा करावी, अशी मनोमन इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. अखेर त्यांनी आपल्या लॉँड्री व्यवसायातूनच देशसेवेला प्रारंभ केला. उपनगर, गांधीनगर, नाशिक रोड भागात शासकीय कार्यालयांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध शाळा, खासगी संस्था येथे ध्वजवंदन होते. या कार्यालयातील ध्वज धुऊन, इस्त्री करून ते पोचविण्याचे काम धीरज कनोजिया १५ वर्षांपासून नियमित करतात. विशेष म्हणजे ही देशसेवा करताना ते कुठलेही मानधन घेत नाहीत. नाशिक रोड भारत प्रतिभूती मुद्रणालय, भारत सरकार मुद्रणालय, चलार्थपत्र मुद्रणालय, कॉम्बेट आर्मी एव्हिएशन, गांधीनगर, उपनगर भागातील विविध शाळा, तसेच खासगी कार्यालयांचे ध्वज त्यांच्याकडे नियमित येत असतात. कनोजिया यांची आगळीवेगळी देशसेवा खरोखरच इतरांना प्रेरणादायी अशीच आहे. देशसेवेची भावना ही व्यक्तीला नेहमीच प्रेरित करीत असते. उपनगर येथील एक लॉंड्रीचालक अशाच देशसेवेने भारावून मागील एक रुपया मानधन न घेता विविध शासकीय कार्यालयांचे ध्वज १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला दर वर्षी धुऊन, इस्त्री करून कार्यालयात पोचवून देण्याचे काम नियमित करीत आले आहेत. कनोजिया यांची देशसेवा इतरांना प्रेरित करणारीच म्हणावी लागेल.

independence day
बहरलेल्या सोयाबीनवर सुकवा; शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा

देशसेवेसाठीच देह झिजवावा

वडील लष्करी विभागात असल्याने देशसेवेचे बाळकडू लहानपणीच मिळाले. माझ्याकडून देशसेवा अशीच घडत राहो, माझ्या मुलांनीही देशसेवेसाठीच देह झिजवावा, हीच इच्छा आहे. - धीरज कनोजिया

independence day
नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचे लक्ष 'किंगमेकर' ठरण्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com