धुळे शिवसेना आगपाखड

धुळे शिवसेना आगपाखड
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर -- जागा असल्यास/ गरजेनुसार लोगो छायाचित्र ः शिवसेना उबाठाचे मशाल चिन्ह घेणे -- धुळ्यात पोलिस सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय? - जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; गुन्हेगारांसह टोळ्यांना नेमके कोणाचे पाठबळ? - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३० : धुळे शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले होणे, जमावाने शासकीय कामात अडथळे आणून आरोपींना पळवून नेण्याचे प्रकार घडणे, यामुळे ‘जिल्ह्यात पोलिसांनाच संरक्षण उरले नाही का?’, असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या येथील पदाधिकाऱ्यांनी निवेदनाव्दारे उपस्थित केला आहे. गुन्हेगारीचा बिमोड केल्याशिवाय जिल्ह्याचा खरा औद्योगिक विकास शक्य नाही, अशी ठाम भूमिकाही या पक्षाने मांडली आहे. - ठाकरे सेनेच्या निवेदनाचा आशय अशा : मोहाडी परिसरात कुख्यात गुन्हेगार भादा याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोर त्याने धारदार हत्यार (तलवार) दाखवून स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न करत पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना घडली. दुसरीकडे आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी शाह याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर जमाव धावून गेला. शासकीय कामात अडथळा आणून आरोपीला पळवून नेण्याचा हा प्रकार अत्यंत चिंताजनक असून, या घटनांनी पोलिस यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. - गुन्हेगारांना राजकीय आश्रय या पार्श्‍वभूमीवर अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित होत आहेत. त्यानुसार सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांना कोणाचे पाठबळ मिळते? पोलिस कारवाईची माहिती आरोपींपर्यंत कशी पोहोचते? पडद्यामागील किंगमेकर कोण, आरोपींना वाचवण्यासाठी जमाव एकत्र आणण्यामागे कोणाचा हात आहे? या सर्व बाबींचा पोलिसांनी निष्पक्ष तपास करून सत्य जनतेसमोर आणावे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून स्वतःचे उदात्तीकरण केले जात आहे. अशा प्रवृत्तींवर केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर त्यांच्या आर्थिक स्रोतांपर्यंत आणि मदत करणाऱ्यांपर्यंत तपास पोहोचला पाहिजे. - गुन्हेगारीची ओळख पुसावी धुळे जिल्हा हा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांना जोडणारा महत्त्वाचा व्यापारी दुवा आहे. राष्ट्रीय महामार्ग, प्रस्तावित मनमाड-इंदूर रेल्वे, तसेच अवधान, नरडाणा व रावेर औद्योगिक क्षेत्रांच्या विस्तारातून जिल्ह्याला मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, जिल्ह्यात गुन्हेगारी, दहशत आणि असुरक्षिततेचे वातावरण कायम राहिले, तर बाहेरील उद्योजक आणि गुंतवणूकदार धुळ्यात कसे येणार? असा सवाल शिवसेनेने केला आहे. फक्त जमिनींचे भाव वाढणे किंवा प्लॉटिंगचे व्यवहार होणे म्हणजे औद्योगिक विकास नव्हे, तर प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे, अशी परखड भूमिका घेण्यात आली आहे. - १४-१ ...चौकट... १४-१ तीव्र जनआंदोलनाचा इशारा धुळे शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि औद्योगिक विकासाला बाधा आणणाऱ्या वातावरणाविरोधात लवकरच पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना ‘उबाठा‘चे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे, निंबा मराठे, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, प्रशांत भदाने, डॉ. अनिल पाटील, अण्णा फुलपगारे, राजू ढवळे, जवाहर पाटील, सुनील पाटील, शिवाजी शिरसाळे, मनोज बंब, आनंद जावडेकर, दिलीप चित्ते आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.