नाशिक- राज्यभरातील वकिलांवर सातत्याने प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना वाढत असताना, दुसरीकडे वकील संरक्षण कायदा आणि वकील वेल्फेअर कायदा शासनाकडे प्रलंबित आहे. सदरील कायदे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी नाशिक वकील संघटनेतर्फे मंगळवारी (ता. ८) जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.