esakal | VIDEO : उदयनराजे भोसले यांच्या मामेभावाच्या लग्नाला दिग्गज नेत्यांची हजेरी; पण 'मास्क' शिवाय!
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal - 2021-03-06T084746.329.jpg

धैर्यशीलराजे पवार यांचे नातू, खासदार उदयनराजे भोसले यांचे मामेभाऊ व नितरंजनराजे पवार यांचे पुत्र अतिशराजे व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका अमिषा पटेल यांची चुलत बहीण व मुंबईस्थित व्यावसायिक सुनील पटेल यांची कन्या अनुशीराजे पटेल यांच्या विवाहाचा रिसेप्शन कार्यक्रम हॉटेल ताज रेसिडेन्सीमध्ये शुक्रवारी (ता. ५) झाला. 

VIDEO : उदयनराजे भोसले यांच्या मामेभावाच्या लग्नाला दिग्गज नेत्यांची हजेरी; पण 'मास्क' शिवाय!

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (जि.नाशिक) : धैर्यशीलराजे पवार यांचे नातू, खासदार उदयनराजे भोसले यांचे मामेभाऊ व नितरंजनराजे पवार यांचे पुत्र अतिशराजे व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका अमिषा पटेल यांची चुलत बहीण व मुंबईस्थित व्यावसायिक सुनील पटेल यांची कन्या अनुशीराजे पटेल यांच्या विवाहाचा रिसेप्शन कार्यक्रम हॉटेल ताज रेसिडेन्सीमध्ये शुक्रवारी (ता. ५) झाला. 

सर्वच नेत्यांची हजेरी पण विनामास्क
खासदार उदयनराजे भोसले, रत्नशीलराजे पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यशराजराजे पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, पोलिस अधिकारी रवींद्रकुमार सिंघल, प्रिन्सिपल सेक्रेटरी विनिता सिंघल, खासदार हेमंत गोडसे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नाडे,

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

मनसे नेते अविनाश अभ्यंकर, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, भाजप नेते सुहास फरांदे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, दिनकर आढाव, उद्योगपती श्रीरंग सारडा, हेमलता पाटील, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी विनामास्क हजेरी लावली. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

loading image