नाशिक : पाच वर्षांच्या तुलनेत करवसुलीत आघाडी

उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली; रस्त्यावर उतरल्याचे फलित
Leading in tax collection as compared to five years
Leading in tax collection as compared to five years

नाशिक : कोरोनामुळे दोन वर्षांपासून कर वसुलीत पिछाडीवर असलेल्या विविध कर विभागाने शेवटच्या आठवड्यात रस्त्यावर उतरून केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून मागील पाच वर्षांच्या तुलनेत कर वसुलीत आघाडी घेतली आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली झाल्याने आत्मविश्‍वास दुणावलेल्या या विभागाने पुढील आर्थिक वर्षांपासूनच थकबाकीदारांकडून वसुलीचा निश्‍चय केला आहे. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयांकडूनदेखील वसुली करण्यात यश मिळाल्याचे कर विभागाचे उपायुक्त अर्चना तांबे यांनी माहिती दिली.

महापालिकेचे प्रशासक रमेश पवार यांनी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर मार्चअखेर पार्श्‍वभूमीवर रस्त्यावर उतरून कर वसुलीच्या सूचना दिल्या. त्यानुसार हातचे सर्व कामे सोडून वसुलीकडे लक्ष देण्यात आले. घरपट्टीचे १३४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते, तर पाणीपट्टीचे ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट मागील वर्षात होते. २६ मार्चपासून कठोर उपाययोजना राबविल्यानंतर पंधरा कोटींची वसुली झाली. शेवटच्या दिवशी साडेपाच कोटी रुपये जमा झाले. घरपट्टीतून १४९. ३७ कोटी रुपये जमा झाले. पाणीपट्टीतून ६४ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले.

दरम्यान, करन्सी नोट प्रेस व्यवस्थापनाकडे महापालिकेची तब्बल १७ कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. घरपट्टीच्या थकबाकीविरोधात प्रेस व्यवस्थापनाने न्यायालयात धाव घेतली असली तरी प्रेस व्यवस्थापनाकडे वसुलीसाठी तगादा लावल्यानंतर रात्री उशिरा ७४ लाख, तर इंडिया सिक्युरीटी प्रेस व्यवस्थापनाने ३४ लाख असे एकूण एक कोटी नऊ लाख रुपये जमा केले.

आकडेवारीवर एक नजर

घर व पाणीपट्टीची पाच वर्षातील सर्वाधिक वसुली झाली आहे. घरपट्टीतून २०१६-१७ मध्ये ८५.७६ कोटी, २०१७-१८ मध्ये ९२.७७ कोटी, २०१८-१९ मध्ये ११४.१९ कोटी, २०१९-२० मध्ये १४१.१६ कोटी, २०२०-२१ मध्ये १२२.८६ कोटी, २०२१-२२ मध्ये १४९. ३७ कोटी रुपये वसुली झाली आहे. पाणीपट्टीतून २०१६-१७ मध्ये २९ कोटी ३७ लाख रुपये, २०१७-१८ मध्ये ४४. ४४ कोटी, २०१८-१९ मध्ये ४४. ६ कोटी, २०१९-२० मध्ये ५४.८० कोटी, २०२०-२१ मध्ये ४९.०९ कोटी, तर २०२१-२२ मध्ये ६४. ८७ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले.

विभागनिहाय वसूल झालेली घरपट्टी व पाणीपट्टी (कोटीत)

  • विभाग - घरपट्टी - पाणीपट्टी

  • सातपूर - १६.८२ - ६.९२

  • पश्‍चिम - २७.२३ - ७.५५

  • पूर्व - २७.५५ - १०.३९

  • पंचवटी - २३.९४ - १०.४२

  • सिडको - २८.९३ - १६.०७

  • नाशिकरोड - २४.८७ - १३.४९

  • एकूण - १४९.३७ - ६४.८७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com