भडकलेल्या पेट्रोलच्या भावावर लिंबूची कुरघोडी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lemon Prices Hike

भडकलेल्या पेट्रोलच्या भावावर लिंबूची कुरघोडी!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निम्बुडा...निम्बुंडा...निम्बुंडा, अरे काचा काचा, छोटा छोटा निम्बुडा लाई दो...जा खेतसे हरियाला निम्बुडा लाई दो....हल दिल दे चुके समन, या चित्रपटातील निम्बुडा गीताने कधी काळी धूम उडवून दिली होती. आज या गीतातील निम्बुडा अर्थातच रसदार लिंबू (Lemon) भर उन्हळ्यात चढ्या दराने गल्लीपासून ते दिल्लीपर्यत गाजत आहे. प्रती किलो दोनशे रूपये दर असलेल्या लिंबूने (Lemon) पेट्रोलच्या (Petrol) भडकलेल्या भावावर कुरघोडी केली आहे. साहजिकच सामान्य माणसांच्या ताटातून लिंबूची वजावट झाली तर उन्हाळ्यातील पाहुण्यांचे स्वागत करणारे थंडगार लिंबू सरबत (Lemonade) घरातून गायब झाले आहे. (Lemon Prices Hike During Summer season)

बाजारपेठेचा व्यवहार नेहमी शेतमालाच्या आवकेवर ठरतो. बदलत्या हवामानामुळे लिंबू उत्पादनात उन्हाळ्याच्या तोंडावर मोठी घट झाली. पिवळेधम्म, रसरशीत हिरवेगार लिंबू त्यामुळे बाजारात मिळणे दुरापास्त झाले आहे. उन्हाळ्यात तहान शमविण्यासाठी लिंबू सरबताकडे नागरिकांचा मोठा ओढा असतो. परंतु, लिंबूच्या मुबलकतेअभावी बाजारात लिंबूचे भाव गगनाला भिडले आहेत. गल्लीतील बाजारात एका लिंबूला पाच रूपये मोजावे लागत आहे. दिल्ली मंडईत निम्बुंडा प्रती नग दहा रूपये सर्रास विक्री होत आहे.

हेही वाचा: महागाईमुळे शीरखुर्म्याचा गोडवा कडवट; सुकामेव्याच्या दरांमध्ये वाढ

लिंबू उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी लिंबूच्या उत्पादकतेवर हवामान बदलामुळे संकट ओढवल्याचे सांगितले. पुसद तालुक्यातील वरूड शिवारात अनेक शेतकऱ्यांकडे लिंब बागा आहेत. डिसेंबर, जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरणामुळे हस्त बहाराला मोठा फटका बसला. खरे पाहता उन्हाळ्यात लिंबूला मोठी मागणी वाढते. मात्र, नेमक्या याच कालावधीत उत्पादनात घट झाली. बाजारपेठत लिंबूचे दर वधारल्याने शेतकरी सुखावला खरा. मात्र, कमी उत्पादकतेमुळे शेतकऱ्यांना चांगला लाभ पदरात पाडून घेणे शक्य झाले नाही.

हेही वाचा: नाशिक : नैराश्यात गेलेल्या कैद्याचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

भाव वाढले, वजन कमी होणार कसे?
आयुर्वेदात लिंबू अतिशय आरोग्यदायी आहे. विटामीन सी चा मुख्य स्त्रोत आहे. त्याशिवाय शारीरिक वजन कमी करण्यासाठी सकाळी गरम पाण्यासोबत लिंबूरस सेवन करण्यात येते. मात्र, लिंबू महागल्याने, बाजारपेठेतून गायब झाल्याने वजन कमी कसे करावे, असा प्रश्‍न आरोग्य सजग नागरिकांना पडला आहे. शिवाय नजर लागू नये म्हणून घरादारावर, कारमध्ये धाग्यात बांधावयाचे लिंबू कसे ओवणार, त्यामुळे अंधश्रध्द व्यक्तींची पुरती पंचाईत झाली आहे.

Web Title: Lemon Prices Hike During Summer Season Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top