लेवा समाजाच्या एकजुटीसाठी जळगावात विचारमंथन

लेवा समाजाच्या एकजुटीसाठी जळगावात विचारमंथन
Published on: 
टुडे ३, मेन फिचर NSK26H35187 जळगाव : लेवा संघटन अभियान समन्वय समिती आयोजित आंतरप्रवाह विवाह सत्कार सोहळा व तज्ज्ञांची गटचर्चा नुकतीच पार पडली, त्यात उपस्थित माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी आदी. ------ लेवा समाजाच्या एकजुटीसाठी जळगावात विचारमंथन उपशीर्षक ‘सकल लेवा संघटन – समृद्धीच्या दिशा’ गटचर्चेसह आंतरप्रवाह विवाह सत्कार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : लेवा संघटन अभियान समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंतरप्रवाह विवाह सत्कार सोहळा आणि ‘सकल लेवा संघटन – समृद्धीच्या दिशा’ या विषयावरील तज्ज्ञ पॅनल गटचर्चा जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी महाविद्यालयात झाली. समाजाच्या एकजुटीसाठी या चर्चेद्वारे मंथन करण्यात आले. लेवा समाजातील विविध प्रवाह, संस्था आणि संघटनांना एका व्यासपीठावर आणून समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय विकासाची दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पिंपळे, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून डॉ. ज्ञानेश्वर पाटील यानी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. आंतरप्रवाह विवाह सत्कारार्थींच्या वतीने चंद्रशेखर पाटील आणि निशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर लेवा समाजातील आंतर प्रवाहातील विवाहितांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. चौकट समाजातील सर्व प्रवाहांनी एकत्र यावे : खडसे समाजाने आपला इतिहास अभ्यासणे आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकसंघ होणे गरजेचे असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी समाजाच्या आर्थिक विकासासाठी शेतीला केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन केले. डॉ. उल्हास पाटील यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वन कम्युनिटी, वन व्हिजन’ हे सूत्र स्वीकारण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन सोनिता वराडे, मंगला पाटील, डॉ. मिलिंद पाटील व डॉ.ज्योती भोळे यांनी केले. तर गटचर्चेचे अभ्यासपूर्वक निवेदन डॉ.ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.