मेनफिचर
(कृपया आधीचे दिलेले मेनफिचर सेकंडमेन करून ही बातमी मेन करावी.)
----------
शहर टुडे पान तीनसाठी
(गर्दी असल्याने फोटो तीन ते चार कॉलम वापरावा)
NSK26H34320
जळगाव : लेवा गुर्जर समाजाच्या परिचय मेळाव्यात पुस्तिकेचे प्रकाशन करताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, रमेश पाटील, ॲड. शांताराम महाजन आदी मान्यवर.
----------
नवविवाहितांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करावा
--------
मान्यवरांचे आवाहन : लेवा गुर्जर समाजाच्या मेळाव्यात २८५ तरुण-तरुणींनी दिला परिचय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२ : नवविवाहितांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करावा. त्या कौटुंबिक वातावरणात ज्येष्ठ नातलगांचे आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी असतात. सर्व युवतींनी व युवकांनी विनाकारण मर्यादेच्या बाहेर जात असलेल्या अपेक्षा लग्नाअगोदर व्यक्त करू नये. मर्यादित अपेक्षेने, आपल्या आपुलकीच्या व बांधिलकीच्या वर्तनाने कौटुंबिक वातावरण सुखमय ठेवण्याचे आवाहन लेवा गुर्जर समाजाच्या परिचय मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी केले.
येथील सरदार वल्लभभाई पटेल (लेवा) भवनात श्री लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठान जळगावतर्फे आयोजित लेवा गुर्जर समाजातील युवक-युतींचा राज्यस्तरीय परिचय मेळावा रविवारी (ता.१) झाला, त्यात मान्यवर बोलत होते. यावेळी देशभरातून समाजातील २८५ युवक-युवतींनी त्यांच्या पालकांसह उपस्थिती देत परिचय करून दिला. अध्यक्षस्थानी ॲड. शांताराम महाजन होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार नंदकिशोर महाजन, वसंतराव महाजन, भागवत पाटील, राजीव पाटील, डॉ. सुरेश पाटील, अनिल महाजन, बन्सीलाल पाटील, सुनील महाजन, रमेश पाटील, प्रल्हाद पाटील, गोपाल पाटील, डॉ. जयंत पाटील, गोपाल पाटील, श्री लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर पाटील, कार्याध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी युवक-युवतींना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शनपर सुसंवाद साधला. प्रास्ताविक सुनील चौधरी सहसचिव यांनी केले. सूत्रसंचालन क्रांती पाटील यांनी केले.
--------
चौकट
पालकांनी मुलीच्या संसारात लुडबूड करू नये
विवाहानंतर कुटुंबातील सासू व सासरे यांनी आपल्या घरी आलेल्या सुनेला मुलगी म्हणून स्वीकार करून आपुलकीने वागवावे. युवतींनी सासरी आल्यावर आपले सासू-सासरे हेच आपले आईवडील आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ आप्तेष्ठांना त्यांच्या जुन्या विचारसरणीवर वादविवाद न करता समजून घेण्याबाबत योग्य सल्ला दिला. विवाहानंतर कन्या सासरी गेल्यावर तिच्या वैवाहिक जीवनात वारंवार कुठलाही हस्तक्षेप न करता तिचा संसार सुरळीत चालू द्यावा, अशाही संयुक्तिक सूचना सर्व युवतींच्या आई-वडिलांना देण्यात आल्यात. जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन घटस्फोटात रूपांतरित होऊ न देण्यावर प्रकाश टाकण्यात आला.