
मध्यंतरीच्या काळात खतांचे दर वाढविल्याच्या बातमीनंतर चढ्या दराने खतांची शेतकऱ्यांना विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील चार किरकोळ व दोन घाऊक खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
नाशिक : मध्यंतरीच्या काळात खतांचे (fertilizer) दर वाढविल्याच्या बातमीनंतर चढ्या दराने खतांची शेतकऱ्यांना विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील चार किरकोळ व दोन घाऊक खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. (Licenses of six shops selling fertilizer suspended in nashik district)
आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे दर वाढल्याचे कारण देत खत उत्पादन करणाऱ्या कंपनीने खतांच्या किंमतीत वाढ करण्याचे हाती घेतले होते. मात्र तत्पूर्वी'कंपनीकडून खरीप हंगामासाठी जुन्या दरानेच विक्रेत्यांना पुरवठा झालेला होता. त्यामुळे दरवाढीच्या प्रस्तावाचा फायदा घेत दुकानादार हे चढ्या दराने शेतकऱ्यांना खतविक्री करतील म्हणून कंपनीसह कृषी विभागाने सर्व'खतविक्री करणाऱ्या दुकानादरांना जुन्या दरानेच खतविक्री करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच दुकानदारांकडून चढ्या दराने खतविक्री केली जावू नये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके देखील नेमली.
मात्र कृषी विभागाने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करत जिल्ह्यातील चार किरकोळ विक्रेते हे खतविक्री करत असल्याचे भरारी पथकास आढळून आल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सचिन फर्टीलायझर (सैंदाणे, मालेगाव), भूषण फर्टीलायझर (उमराणे, देवळा), आशापुरी कृषी सेवाकेंद्र, मे.वर्धमान ॲण्ड कंपनी (उमराणे, देवळा) या चार किरकोळ वितरकांसह दोघ घाऊक विक्रेत्यांवर भाव फलक व साठा फलक न लावणे, माहिती अद्यावत न करणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, अभिलेखात अनियमितता या कारणावून यांचे परवाने निलंबित करण्यात आले.
(Licenses of six shops selling fertilizer suspended in nashik district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.