esakal | मालेगाव : शेतकऱ्याला व्यापाऱ्याची मारहाण; दोन आडत्यांचे परवाने रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

licenses of two traders were revoked in a case of beating of a farmer in malegaon

शेतकऱ्याला व्यापाऱ्याची मारहाण; दोन आडत्यांचे परवाने रद्द

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळफळावळ विभागात शेतमाल लावण्याच्या वादातून दिलीप पवार (रा. वसंतवाडी, ता. पारोळा) या शेतकऱ्याला मारहाण करणे व्यापाऱ्यांना चांगलेच महाग पडले. बाजार समितीने कृषीमंञ्यांचे वर्चस्व असलेल्या समितीतच हा प्रकार घडल्याने कठोर कारवाई करत समितीतील धनश्री व्हेजीटेबल कंपनी व रेणुकामाता व्हेजीटेबल कंपनी या दोन्ही फर्मच्या भाजीपाला आडत व्यवसाय परवाना (लायसन्स) निलंबित केला आहे. ही माहिती सचिव अशोक देसले यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. ‘सकाळ’मध्ये आज या संदर्भात सविस्तर वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचे उत्स्फुर्त स्वागत केले होते.

शेतकरी व व्यापारी यांच्यात झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. व्यापाऱ्याने शेतकऱ्याला मारहाण केल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत हाेते. मंगळवारी (ता. ५) रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर पाटील यांनी समितीकडे लेखी तक्रार दिली. बाजार समितीने धनश्री व्हेजीटेबलला नोटिस बजावत सात दिवसाच्या आत समितीकडे खुलासा करावा. लेखी खुलासा समाधानकारक न वाटल्यास समितीचा गाळा ताब्यात घेऊन तुमचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा दिला होता. खुलासा करण्याचा अवधी संपण्यापुर्वीच याप्रश्‍नी रान उठण्याची शक्यता लक्षात घेऊन समिती प्रशासनाने दुसऱ्या दिवशीच परवाना रद्द केल्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

समितीच्या भाजीपाला व फळफळावळ आवारात घडलेल्या या प्रकारात धनश्री व्हेजीटेबलसह रेणुकामाता फर्मचा मारहाणीत सहभाग असल्यामुळे मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी पुर्ण होईपर्यंत शुक्रवारपासून (ता. ८) मे. रेणुकामाता व्हेजीटेबल कंपनी व मे. धनश्री व्हेजीटेबल कंपनी या दोन्ही फर्मचा भाजीपाला आडत व्यवसाय व खरेदीचा व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. परवाना निलंबन काळात आडतीचा व्यवसाय करू नये व आडत गाळा बंद ठेवण्यात यावा अशा नोटीसा समितीकडून देण्यात आल्या आहेत. नोटीसमधील सुचनांचे उल्लंघन झाल्यास सदरचा गाळा बाजार समिती खाली करून ताब्यात घेण्याची कारवाई करेल असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: नाशिक : आडगावच्या दुर्गा पतसंस्थेत पावणे ३ कोटींचा गैरव्यवहार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष अहिरे यांनी ‘सकाळ’चे अभिनंदन करतानाच आज शिष्टमंडळासह समितीचे सचिव श्री. देसले यांची भेट घेत अडत्यांचा परवाना रद्द करुन फौजदारी कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन सादर केले. निवेदनात शुल्लक कारणावरुन समितीचा आत्मा असलेल्या शेतकऱ्यालाच मारहाण करणे निंदनीय आहे. दोषी व्यापाऱ्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात अहिरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, चंद्रकांत अहिरे आदींचा समावेश होता.

हेही वाचा: नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या

loading image
go to top