
निफाड - पिडित युवतीच्या घरासमोरुन ये-जा करत, प्रेम कर, लग्न कर, असे म्हणत त्रास देऊन पिडितेने नकार दिल्यावर घरात जाऊन पिडितेच्या वडिलांसमोर खुन केला. व पिडितेच्या वडीलांचाही खुन करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात सुरज दिगंबर चव्हाण (रा. मौजे सुकेणे) यास दोषी ठरविण्यात आले. त्यास निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश बी डी पवार यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.