कार दुचाकी अपघातात हेल्मेट फुटले पण जीव वाचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

कार दुचाकी अपघातात हेल्मेट फुटले पण जीव वाचला

वणी (जि. नाशिक) : वणी- कळवण रस्त्यावरील पायरपाडा शिवारात हुंडाई व्हेन्यू कारने ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरधार धडक दिल्याने दोघे मोटरसायकलस्वारासह चौघे जखमी झाले.

शनिवारी (ता.११) दुपारी तीनच्या सुमारास हिरो स्पलेंडर (एमएच १५, जीवाय ६३१३) ही नांदुरी बाजूकडून वणीकडे जात असताना समोरुन नांदुरीकडे जाणारी हुंडाई व्हेन्यू कार (एमएच १५, एच सी ८०७३) हीच्या चालकांने दुसऱ्या वाहनास ओव्हरटेकच्या नादात जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील किरण रमेश पवार (२५) व सरला शंकर भोये (२५) रा. मांगदे, ता. सुरगाणा हे गंभीर जखमी झाले. धडक इतकी जोरात होती, की दुचाकीवरील दोघेही धडक देणाऱ्या कारवरून उडून रस्त्यावर फेकले गेले. दुचाकीस्वाराच्या डोक्यातील हेलमेटही फुटले, मात्र सदैवाने डोक्यास गंभीर मार न लागल्याने तो बचावला. कारमधील योगेश विनायक आव्हाड (३२) व नेहा सचिन जगडे (३०, रा. लासलगाव) हे किरकोळ जखमी झाले. जखमींना येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर कारमधील जखमी हे लासलगाव येथे उपचारासाठी गेले. दुचाकीवरील जखमींना सायंकाळी उशिरा गुजरात येथे पुढील उपचारासाठी गेले. याबाबत कारचालकावर पोलिसांत उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: नाशिक : वीजचोरी प्रकरणी 261 जणांवर कारवाई

वणी व परिसरात काल (ता.१०) मेघगर्जनेसह सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर बत्तीगुल झाली होती. आज पाऊस नसतांनाही शनिवारीही सकाळी साडेनऊपासून वणी व परिसरात बत्ती गुल असल्याने रुग्णालयात वीज नसल्याने मोबाईलचे टॉर्च लाऊन वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना जखमींना टाके घालावे लागले.

हेही वाचा: झाडांच्या सदोष छाटणीने नागरिकांचे बळी

Web Title: Life Save Due To Helmet In Car Bike Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonaccident
go to top