खामखेडा- सध्या विवाह समारंभाची गर्दी असून, प्रत्येक विवाहात पाहुणे मंडळींची वर्दळ वाढली आहे. एका तिथीला पाच-सहा विवाहांची पत्रिका असल्याने एकेका दिवशी या विवाहांना हजेरी लावणारी मंडळी भोजन करणे टाळू लागल्याने वधूपित्याने तयार करून ठेवलेल्या अन्नाची नासाडी होत आहे.