(दोन कॉलम वापरावी)
---------
एम. ए.(मराठी)च्या संदर्भ ग्रंथांत
‘उजेड पेरणारी माणसं’चा समावेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : येथील कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशाेधन केंद्रातील ‘एम. ए.’च्या मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित झाला आहे. त्यातील द्वितीय सत्रात ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी जळगावचे लेखक आनंदा लाेटन पाटील यांच्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या वैचारिक साहित्यकृतीची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.
विभागप्रमुख व अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. डाॅ. म. सु. पगारे, सदस्य डाॅ. दीपक खरात, डाॅ. भारती साेनवणे, प्रा. डाॅ. युवराज मानकर, डाॅ. सुनील अवचार, प्रा. डाॅ. आशुताेष पाटील यांनी ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी लागणाऱ्या संदर्भ ग्रंथांची निवड केली आहे. त्यात आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाची संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट केला आहे. एम.ए.च्या (भाग १) द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांना निवडक वैचारिक लेखनाचा अभ्यास करण्यासाठी या साहित्यकृतीची मदत हाेईल. दरम्यान, या पुस्तकात खानदेशातील निवडक अशा ८४ अवलियांचा संक्षिप्त जीवनप्रवास मांडला आहे. कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, ग्रामसंस्कृती अशा विविध क्षेत्रात काम करणारी ही माणसं आहेत.