
मतदार याद्या आधारशी जोडणार; निर्दोष मतदारयाद्यांसाठी आयोगाचा उपक्रम
नाशिक : मतदारयाद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी निवडणूक आयोगाने (State election commission) मतदार याद्यांना (voter list) आधार क्रमांक जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मतदारांनी त्यांच्या नावाला आधार क्रमांक जोडण्याची मोहीम ऐच्छिक आहे. (Linking voter lists with Aadhaar state election Commission Initiative for Innocent Electoral Rolls nashik latest NMC election news)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे.
त्यानुसार मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलीत करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२२ ला पहिल्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली.
हेही वाचा: Nashik : मागील वर्षाच्या तुलनेत 53 टक्के अधिक साठा
मतदार यादीतील विद्यमान मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ६ ब तयार करण्यात आला असून, ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक ६ ब भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
तसेच त्यासाठी विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फतही घरोघरी भेटी देऊन माहिती संकलीत करणार आहेत. तसेच https://nvsp.in/ किंवा https://ceo.maharashtra.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असेल. त्यामुळे मतदार स्वत:ही त्यांचे आधार क्रमांक मतदार यादीला जोडू शकणार आहेत.
४ सप्टेंबरला विशेष शिबिर
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलीत करण्यासाठी ४ सप्टेंबरला पहिले विशेष शिबिर होणार आहे.
हेही वाचा: पडताळणी समितीला मिळेना कार्यालय; 6 महिन्यांपासून अपुऱ्या जागेत कामकाज
Web Title: Linking Voter Lists With Aadhaar State Election Commission Initiative For Innocent Electoral Rolls Nashik Latest Nmc Election News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..