esakal | द्राक्षाचे लोकल मार्केट वाढताच निर्यातीचे दर कडाडले
sakal

बोलून बातमी शोधा

grapes market

द्राक्षाचे लोकल मार्केट वाढताच निर्यातीचे दर कडाडले

sakal_logo
By
सुभाष पुरकर

वडनेर भैरव (जि. नाशिक) : निर्यातक्षम द्राक्ष(grapes) मालाच्या दरांवर स्थानिक बाजारपेठेचे (local market) दर दरवर्षी ठरतात. यावर्षी स्थानिक बाजारपेठेवर निर्यात(export) होणाऱ्या मालाची किंमत ठरताना दिसत आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीला निर्यात होणाऱ्या मालाला चांगले दर मिळाले.(local market for grapes grew, so did the export prices)

मालाची टंचाई होताच वाढतात भाव

हंगामाच्या मधल्या टप्प्यात द्राक्ष उत्पादकांना व्यापारी, निर्यातदार यांनी अक्षरशः लुटले. निर्यात होणाऱ्या मालाचे दर पडले की पाडले यावर अनेक चर्चा झाल्या. हंगामाच्या शेवटी स्थानिक बाजारपेठेत मालाची टंचाई होताच भाव वाढले. हे भाव वाढल्यानंतर निर्यात होणाऱ्या मालाची भाव कडाडले. मग या आधी निर्यात झालेल्या मालाला भाव का मिळाला नाही असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा: सगळेच दिवस सारखे..तब्बल पंधरा वर्षांपासून घसा कोरडा

शेतकऱ्यांची लुबाडणूक ?

यंदाचा व गेल्या वर्षी चा द्राक्ष हंगाम उत्पादकांसाठी मोठ्या प्रमाणात तोट्याचा ठरला आहे. हंगामाच्या सुरुवातीस दर चांगले होते. मार्केटमध्ये माल वाढताच युरोपसह बाहेर देशांमध्ये निर्यात होणाऱ्या मालाचे दर प्रचंड प्रमाणात कोसळले होते. निर्यात होणाऱ्या दरावर स्थानिक बाजाराचे दर ठरायचे. यंदा मात्र हंगामाच्या शेवटी लोकल मार्केटच्या भावात वाढ होताच निर्यातीच्या दरातही प्रचंड वाढ झाली. ही शेतकऱ्यांची लुबाडणूक असल्याची प्रतिक्रिया शेतकरी सोशल मीडियातून व्यक्त करीत आहेत. प्रारंभी निर्यातीचे दर 80 ते 100 रुपयांपर्यंत होते. लोकल मार्केटचे दर चाळीस ते पन्नासपर्यंत होते मधल्या टप्प्यात घरात घसरण होत निर्यातीचे दर 40 ते 60 रुपयांपर्यंत राहिले. अशातच लोकल मार्केटचे दर 15 ते 25 रुपयांपर्यंत होते. या दरांमध्ये शेवटच्या टप्प्यात वाढ होऊन आधी लोकलच्या मालाचे दर वाढून 35 ते 45 रुपये झाले, हे दर वाढताच निर्यात होणाऱ्या मालाचे दर वाढून 60 ते 90 रुपये झाले आहे.

हेही वाचा: दोनशे लसींसाठी भरली पाचशेवर नागरिकांची जत्रा!

''मागील 15 वर्षाच्या तुलनेत यंदा निर्यातीचे दर खुपच कमी होते. अगदी स्थानिक बाजारपेठेपेक्षा पण कमी. मागणी कमी म्हणून मार्केट कमी असेही नव्हते. कारण बांगलादेशचे व इतर बरेच व्यापारी 7-8 गाड्या माल दररोज पाठवत होते. यावेळी 12-14 गाड्या पाठवत आहेत. निर्यात मोठ्या प्रमाणात झाली. माल मोठ्या प्रमानात पॅकिंग होत होता. यावरुन मागणी असल्याचे लक्षात येते. तरीदेखील दर कमी होते. लोकल, बांगलादेशची बाजारपेठ पाहून निर्यातीचे भाव निश्चित झाले. आपले दर त्या आसपास निश्चित करतात व बाहेर जास्त दराने माल विकुन जास्त नफ़ा कमवतात.''

- अरविंद भालेराव, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव