मिरची कोणी फुकटही घेईना! शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला रोटर

लॉकडाउन(lockdown) लावल्यामुळे बाजारपेठा(Market) बंद आहेत. व्यापारीही मिळणे कठीण झाल्याने संतप्त शेतकऱ्याने मिरचीवर रोटर फिरविला.
farmer
farmeresakal
Updated on

भऊर (जि. नाशिक) : येथील शेतकऱ्याने(Farmer) एक एकरमध्ये मिरची(Chili) पिकाची लागवड केली होती. परंतु संचारबंदीमुळे तसेच लॉकडाउन(lockdown) लावल्यामुळे बाजारपेठा(Market) बंद आहेत. व्यापारीही मिळणे कठीण झाल्याने संतप्त शेतकऱ्याने मिरचीवर रोटर फिरविला. (Lockdown causes damage to agriculture)

लॉकडाउनमुळे मिरची कोणी फुकटही घेईना

भऊर येथील प्रगतिशील शेतकरी शिवमन पवार याने गतवर्षी चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळाल्याने याही वर्षी एक एकर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली. यासाठी जवळपास ३५ ते ४० हजार रुपये खर्च केला. पवार यांना या पिकापासून जवळपास दोन ते तीन लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. या वर्षी वातावरण पूरक असल्याने मिरचीची वाढही चांगली झाली होती. रंगाच्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र लॉकडाउन असल्याने हॉटेल व्यवसाय बंद आहेत. तसेच बाजापेठा बंद असल्याने विक्री व्यवस्थादेखील ठप्प झाली आहे. परिणामी निर्यातक्षम मिरची खराब होत आहे. ४० ते ५० रुपये किलोप्रमाणे जागेवर विक्री होणारी मिरची आज लॉकडाउनमुळे फुकटही कोणी घेत नाही. मिरची तोडणीसाठी लागणारा खर्चही निघत नसल्याने हतबल होत शेतकरी पवार यांनी आपल्या उभ्या मिरची पिकावर नाइलाजाने रोटर फिरविला.

farmer
‘निगेटिव्ह’ असाल तरच राज्यात प्रवेश; कसे आहेत नवीन नियम
farmer
पोटात बाळ घेऊन कोरोनारुग्णांची सेवा करणारी गर्भवती हिरकणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com