Nashik MD Drug Case : लोहारे, हरिश पंत यांना यापूर्वीही अटक; असा आला ललित लोहारेच्या संपर्कात

MD drugs stock and paraphernalia seized by Unit One team of Nashik City Crime Branch in May 2018. Along with the then Commissioner Ravindra Kumar Singal, Deputy Commissioner Vijay Kumar Magar, Unit One Police Inspector Ananda Wagh and the team.
MD drugs stock and paraphernalia seized by Unit One team of Nashik City Crime Branch in May 2018. Along with the then Commissioner Ravindra Kumar Singal, Deputy Commissioner Vijay Kumar Magar, Unit One Police Inspector Ananda Wagh and the team.esakal

Nashik MD Drug Case : शिंदेगावात एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जचा कारखाना थाटण्यास मदत करणारे अरविंद लोहारे, हरिश पंत यांना नाशिक पोलिसांनी २०१८ मध्ये एमडी ड्रग्जप्रकरणी अटक केली होती.

त्याचवेळी ललित पाटील हा अरविंद लोहारे याच्या संपर्कात आल्याचे तपासातून समोर आले आहे.(Lohare and Harish Pant arrested earlier by police nashik md drug case news )

त्यावेळी नाशिक शहर गुन्हेशाखेच्या पथकाच्या हाती शहरात पहिल्यांदा एमडी ड्रग्ज लागले होते. तपासाअंती पंतला बोईसर आणि लोहारे यास उत्तरप्रदेशातून अटक केली होती. शिंदेगावातील एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्यासाठी ललित पाटील याने अरविंद लोहारे याच्या माध्यमातून हरिश पंत याच्याकडून फॉर्म्युला भूषण पाटीलला मिळवून दिला.

त्यानंतर हरिश पंत आणि जिशान यांच्याच देखरेखीखाली शिंदेगावात डिसेंबर २०२२ मध्ये एमडीचा कारखाना सुरू केला होता. मात्र राज्यभर गाजत असलेल्या या एमडी ड्रग्जमध्ये अटक करण्यात आलेला व फॉर्म्युल्याचा मास्टरमाईंड अरविंद लोहारे व हरिश पंत यांना नाशिक शहर गुन्हेशाखेच्या पथकाने मे २०१८ मध्येच अटक केली होती.

त्याचवेळी, ललित पाटील हा न्यायालयीन कोठडीतील संशयितांना जामीन मिळवून देण्याचे काम करायचा. या संपर्कातून त्याची अरविंद लोहारे याच्याशी ओळख झाली. लोहारे याने जामीन मिळवून देण्यासाठी ललितच्या खात्यावर ६५ लाख रुपये जमा केले होते. काही दिवसांनी लोहारे, पंत यांना जामीन मिळून ते बाहेर आले. परंतु २०२० मध्ये अरविंद लोहारे चाकणमधील एमडी ड्रग्जप्रकरणात पुन्हा अटक झाला होता.

MD drugs stock and paraphernalia seized by Unit One team of Nashik City Crime Branch in May 2018. Along with the then Commissioner Ravindra Kumar Singal, Deputy Commissioner Vijay Kumar Magar, Unit One Police Inspector Ananda Wagh and the team.
Nashik MD Drug Case: एमडी ड्रग्‍ज कारखाना उभारणीसह विक्रीत हरिशपंतचा सहभाग उघड

त्याच चौकशीतून ललितलाही पुणे पोलिसांनी अटक केली होती. येरवडा कारागृहात असतानाच ललितने लोहारेशी जवळीक साधून एमडीचा फॉर्म्युला मिळविला आणि तो भूषण पाटीलला दिला. लोहारेच्याच सांगण्यावरून हरिश पंत याने भूषण पाटीलला शिंदेगावात एमडी कारखाना सुरू करण्यास मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

२०१८ चा गुन्हा

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे तत्कालीन पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सात गावठी कट्टयासह रणजित मोरे या सराईत गुंडाला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग्जही पोलिसांच्या हाती लागले होते. कसून चौकशी केल्यानंतर नदीम सौरठिया, सौफुला शेख (रा. मुंबई) या दोघांना मुंबईतून अटक केली. त्यांच्या चौकशीतून ते अरविंद लोहारे याच्याकडून एमडी घेत असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी लोहारे यास उत्तरप्रदेशातून अटक केल्यानंतर, त्याने हरिश पंतच्या बोईसर येथील फ्लॅटमध्ये एमडी तयार करीत असल्याचे सांगताच पंतला नाशिक पोलिसांनी अटक केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी तपास पथकाचे कौतुकही केले होते.

MD drugs stock and paraphernalia seized by Unit One team of Nashik City Crime Branch in May 2018. Along with the then Commissioner Ravindra Kumar Singal, Deputy Commissioner Vijay Kumar Magar, Unit One Police Inspector Ananda Wagh and the team.
Nashik MD Drug Case: शिंदेगाव एमडी कारखान्याचा मास्टरमाईंड ललितच! ललित-भूषणच्या चौकशीतून स्पष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com