Nashik Loksabha Election : 'लोकसभा' निवडणूक लढवावी : ॲड. ठाकरेंना हितचिंतकांचा आग्रह

मेळाव्‍यातून शक्‍तीप्रदर्शन करताना प्रश्‍नावलीतून केलेल्‍या सर्वेक्षणाच्‍या विश्‍लेषणानंतर उमेदवारीसाठी पक्षाची निवड केली जाईल, अशी भूमिका त्‍यांनी जाहीर केली.
MVIPR General Secretary Adv. Nitin Thackeray supporters and well-wishers present at the exchange meeting organized by Mitra Parivar
MVIPR General Secretary Adv. Nitin Thackeray supporters and well-wishers present at the exchange meeting organized by Mitra Parivaresakal

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेचे सरचिटणीस व जिल्‍हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी हितचिंतक समर्थकांकडून सोमवारी (ता.५) विचार विनिमय मेळाव्‍यातून केली.

मेळाव्‍याच्‍या समारोपप्रसंगी समर्थकांचे आभार मानत ॲड. ठाकरे यांनी निवडणूक लढविण्यास होकार दर्शविला. कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे यांचे स्‍वप्‍न पूर्ण करताना मतदारसंघातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व घटकांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी लढणार असल्‍याचे मनोगतात नमूद केले.

मेळाव्‍यातून शक्‍तीप्रदर्शन करताना प्रश्‍नावलीतून केलेल्‍या सर्वेक्षणाच्‍या विश्‍लेषणानंतर उमेदवारीसाठी पक्षाची निवड केली जाईल, अशी भूमिका त्‍यांनी जाहीर केली. (Lok Sabha should be contested Well wishers urged to Adv nitin Thackeray nashik political news)

मखमलाबाद लिंक रोडवरील धनदाई लॉन्‍स येथे झालेल्‍या विचारविनिमय मेळाव्‍याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या स्तरावरून मनोगत व्‍यक्‍त करताना लोकसभा लढविण्यासंदर्भात समर्थन देण्यात आले.

निवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव भामरे यांनी मनोगतातून उमेदवारीला अनुमोदन दिले. निवृत्त प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ म्‍हणाले, ॲड. ठाकरे यांच्‍या माध्यमातून योग्‍य उमेदवार नाशिक लोकसभा मतदारसंघाला मिळू शकेल.

डॉ. बाळासाहेब गुंजाळ म्‍हणाले, ॲड. ठाकरे यांना समृद्ध वारसा लाभलेला असून, त्‍यांच्‍यासारख्या सुसंस्‍कृत उमेदवाराची मतदार संघाला आवश्‍यकता आहे. कैलास पाटील म्‍हणाले, की कुठल्‍याही पक्षाकडून ॲड. ठाकरे उभे राहिल्‍यास, सर्व मिळून निवडून देऊ.

बाळासाहेब सूर्यवंशी म्‍हणाले, ॲड. ठाकरेंना उमेदवारी म्‍हणजे मराठा समाजाला उमेदवारी असेल. त्‍यामुळे संपूर्ण समाज त्‍यांच्‍या पाठीशी उभा राहील.

ॲड. जयंत जायभावे म्‍हणाले, कायदा बनविण्याच्‍या प्रक्रियेत खासदारांची भूमिका महत्त्वाची असते. त्‍यामुळे ॲड. ठाकरे यांच्‍या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण देशाला होऊ शकेल. वकिलांतर्फे ॲड. मंदा गायधनी यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

मविप्र संस्‍थेतर्फे सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्‍हणाले,‍ वर्षभरात ॲड. ठाकरेंच्‍या नेतृत्त्वाखाली संस्‍थेने भरीव कामगिरी केलेली आहे. त्‍याप्रमाणे ते मतदार संघातही कर्तृत्व गाजवतील. पक्षभेद विसरून संपूर्ण संस्‍था त्‍यांच्‍या पाठीशी उभी राहील.

संचालक ॲड.संदीप गुळवे म्‍हणाले, इगतपुरी तालुक्‍यातून संपूर्ण समर्थ मिळेल. डॉ. ऋषिकेश आहेर यांच्‍यासह अन्‍य काही व्‍यक्‍तींनी निवडणूक लढविण्यासाठी सत्ताधारी भाजपचा पर्याय सुचविला. 'इंडिया' आघाडीकडून निवडणूक लढविण्याची भालचंद्र पाटील यांनी मनोगतातून मागणी केली.

समारोपाप्रसंगी ॲड. ठाकरे म्‍हणाले, मविप्र संस्‍थेतील विविध पदे भूषविताना शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याची संधी मिळाली. वकिलांच्‍या संघटनेचे नेतृत्व सातत्‍याने करत आहे.

साहित्‍य क्षेत्राशी निगडित संस्‍थांवरही जबाबदारी सांभाळताना अखिल भारतीय साहित्‍य संमेलनात जबाबदारी सांभाळली. मतदार संघाच्‍या जनेतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उमेदवारी करत असल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

MVIPR General Secretary Adv. Nitin Thackeray supporters and well-wishers present at the exchange meeting organized by Mitra Parivar
Nashik Political: दिनकर पाटील यांना भाजपने उमेदवारी द्यावी; महानुभाव पंथ, वारकरी मंडळाचे ज्येष्ठांना साकडे

हे सभागृह शुभशकुनी

मविप्र निवडणुकीच्‍या तयारीसाठी सर्वात पहिली सहविचार सभा या सभागृहात झाली होती. त्‍यामुळे हे सभागृह शुभशकुनी असून, लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीचा बिगुलदेखील याच सभागृहातून वाजला असून, यश नक्‍की मिळेल असा विश्‍वास ॲड. ठाकरे यांनी व्‍यक्‍त केला.

शेतकऱ्यांसाठी लढ्याची आठवण

डीपी प्‍लॅन जाहीर झाल्‍यानंतर आरक्षणासंदर्भात शेतकऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी थेट बांधावर गेला होतो. शासन दरबारी योग्‍य प्रकारे शेतकऱ्यांची भूमिका मांडल्‍याने साडे पाचशेपैकी तीनशे आरक्षण उठविण्यात यश आले.

एक रुपया न घेता शेतकऱ्यांसाठी लढा दिल्‍याची आठवण ॲड. ठाकरे यांनी काढली. निवडून आलेल्‍या पक्षाची शेतकरीविरोधी भूमिका राहिल्‍यास प्रसंगी कर्मवीर मुरकुटे यांच्‍याप्रमाणे राजीनामा देण्यासह पुढे मागे बघणार नसल्‍याची परखड भूमिका त्‍यांनी मांडली.

देणग्‍यांचा पाऊस..

ॲड. ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीसाठी समर्थन दर्शविताना सभागृहात उपस्‍थित काहींनी देणग्‍यादेखील जाहीर केल्‍या. यात कळवणचे संचालक रवींद्र देवरे यांनी अकरा लाखांची रक्‍कम जाहीर केली.

चंद्रकांत ठाकरे यांच्‍याकडून १ लाख, किशोर माने १ लाख, अशोक बुनगे १ लाख, नंदू राजोळे, मंगेश राजोळे, खंडू बोडके यांच्‍याकडून ५१ हजार, अशोक कुंदे व माणिक कुंदेंकडून १ लाख, निवास मोरे २५ हजार, विक्रम काळे ११ हजार यांसह इतर काहींनी देणग्‍या जाहीर केल्‍या.

सर्वेक्षणात दोन पर्याय..

निवडणुकीत पक्षासंदर्भात निर्णय जाहीर न करता सर्वेक्षणाच्‍या विश्‍लेषणानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ॲड.ठाकरे यांनी जाहीर केले. परंतु सर्वेक्षणाच्‍या फॉर्ममध्ये महायुती व इंडिया आघाडी असे दोन पर्याय नोंदविलेले होते.

MVIPR General Secretary Adv. Nitin Thackeray supporters and well-wishers present at the exchange meeting organized by Mitra Parivar
SAKAL Impact: मालेगाव वीजचोरीच्या समूळ उच्चाटनासाठी स्वतंत्र पथक! गृह मंत्रालयाची दखल; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com