नाशिक- लम्पी आजार झालेल्या गायींचा लोखंडे मळा परिसरातील रहिवासी भागामध्ये मुक्त वावर सुरू आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे इतर प्राण्यांना व नागरिकांना बाधा होऊन आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या गायींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.