घोटी-सिन्नर महामार्गावर धुळीचे लोट; वाहनधारकांसह शेतकरी हैराण

Road
Roadesakal

इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg) अनेकांना समृद्ध करून गेला, तर परिसरातील शेतकरी व नागरिकांना त्रस्तही करीत आहे. समृद्धी महामार्गावर पिंपळगाव मोर व धामणीजवळ क्रॉसिंग असून, काम सुरू आहे. मागील काळात तयार केलेला काँक्रिटीकरण रस्ता क्रॉसिंग परिसरात केला नसून क्रॉसिंगवरील पुलाचे काम झाल्यानंतर होणार आहे.

प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी

‘समृद्धी’चे काम सुरू असलेल्या भागांत ठेकेदार कंपनी प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. निव्वळ खडी, कच टाकून सारवासारव केली जाते. टिकाऊ काम केले जात नसल्याने तिथला रस्ता खड्डेमय झाला आहे. गतवर्षी याच भागात डांबरीकरण केले होते. त्यामुळे रस्ता काही काळ चांगल्या स्थितीत होता. ‘समृद्धी’च्या अवजड वाहनांची वर्दळ व मार्गावरील सततच्या गर्दीने रस्त्याची पुरती वाट लागली.

Road
सर्पदंश झालेल्या महिलेचा अंधश्रद्धेने घेतला बळी; उपचाराअभावी मृत्यू

खराब रस्त्यामुळे उडते वाहनचालकांची भंबेरी

क्रॉसिंगवरील रस्त्याच्या तुकड्यावर निव्वळ खडी टाकल्याने तीन दुचाकीस्वार घसरून पडले. शिवाय अचानक धुळीचे लोळ उठल्याने वाहनचालकांना समोर गाड्याही दिसत नाही. सुदैवाने अजून तरी मोठा अपघात झालेला नाही. मागे-पुढे उत्तम रस्ता असल्याने व वेगात वाहने येऊन अचानक खराब रस्त्यामुळे वाहनचालकांची भंबेरी उडत असल्यने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. धुळीच्या प्रचंड लोळांनी परिसरातील पिकांवर परिणाम झाला आहे. आधीच खरिपाच्या पिकांचे उत्पन्न भांडवल म्हणून रब्बी हंगामात गुंतवून ठेवले आहे. पिकांच्या पानांवर धूळ जमा झाल्याने हरितकणांची क्रिया योग्य होत नाही, तसेच फुलांवर धूळ बसल्याने फूल, कळी जळून जात आहे. क्रॉसिंगवर खड्डेमय झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून दीर्घकाळ टिकाऊ काम करावे, अशी मागणी दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, भाविक, पर्यटक व शेतकऱ्यांनी केली आहे.

''समृद्धी क्रॉसिंगवरील रस्त्याबाबत कंपनीचे नेहमीचे रडगाणे असून, तात्पुरती मलमपट्टी करणे हे अगदी लहान मुलांना नादी लावण्यासारखे आहे. भक्कम व टिकाऊ डांबरीकरण करून स्थानिकांसह वाहनधारकांना तत्काळ दिलासा द्यायला हवा.'' - पांडुरंग वारुंगसे, माजी सभापती, इगतपुरी

Road
नाशिक : कांदाचाळ दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु

''रस्त्याच्या धुळीने नकोनकोसे केले असून, गुंतवलेले भांडवल मातीमोल जाते की काय, अशी भीती वाटत आहे. लवकरात लवकर यातून मार्ग काढून आम्हा शेतकऱ्यांना त्रासमुक्त करावे.'' - उत्तम काळे, शेतकरी, पिंपळगाव मोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com