पंचवटी: केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी एक लाख एक हजार ३९५ वाहनधारकांनी ऑनलाइन अर्ज केले असून, ४८ हजार ५९९ वाहनधारकांना त्या प्राप्त झाल्या आहेत. वाहनधारकांच्या तुलनेत नंबरप्लेट नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळताना दिसून येतो. त्यामुळे प्रशासनाने ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे.