मनमाड- राज्य सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याने सामान्य नागरिकांना महागाईचा नवा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यापासून घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांची, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल ३५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मागील १४ महिन्यांत गॅस दरात पाच वेळा वाढ झाल्याने महिलांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांचा संताप वाढला आहे.