LPG Cylinder
sakal
नाशिक
Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा
Government Steps to Ensure Smooth LPG Cylinder Supply : मध्य पूर्व देशांतील युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि गॅस पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न.
नाशिक: मध्य पूर्व देशांमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती, तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत सरकारने सुरळीत पुरवठ्यासाठी पावले उलचली आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समित्या गठित करण्यात येणार आहेत. समाजमाध्यमांवर सिलिंडरबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
