LPG Gas Cylinder Rates Hike: ‘घरगुती गॅस परवडेना, जळाऊ लाकूड मिळेना’! गॅस सिलिंडर अकराशेच्या घरात | LPG Gas Cylinder Rates Hike reached eleven hundred nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LPG Gas Cylinder Rates Hike

LPG Gas Cylinder Rates Hike: ‘घरगुती गॅस परवडेना, जळाऊ लाकूड मिळेना’! गॅस सिलिंडर अकराशेच्या घरात

LPG Gas Cylinder Rates Hike : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती बऱ्याच दिवसांपासून सातत्याने वाढतच असल्याने एका घरगुती सिलिंडरची किंमती एक हजार १०६ रुपयाच्या घरात पोचली आहे. यातच सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ८३ रुपये कपात केली.

मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल न केल्याने आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती देखील कमी करण्याच्या मागणी ग्रामीण भागातील महिलांकडून केली जात आहे. कमी कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. (LPG Gas Cylinder Rates Hike reached eleven hundred nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत साधारणतः १ हजार १०६ रुपये असल्याने ग्रामीण भागात सिलिंडर ऐवजी महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

यातच शासनाकडून दिली जाणारी सबसिडी देखील बंद असल्याने आता गॅस सिलिंडर वापरणे जिकरीचे बनू लागली आहे. एकीकडे सिलिंडर परवडेना आणि जळाऊ लाकूड मिळेना’ अशी परिस्थिती ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळू लागली आहे.

वर्षभरात सिलिंडरचे दर किती वाढले

महिना घरगुती

२२ मार्च २०२२ - ५०

७ मार्च - ५०

१९ मे - ५०

६ जुलै - ५०

१ मार्च २०२३ - ५०

"गॅस वापरणे आता पूर्वीसारखे परवडत नाही. शासनाकडून सबसिडी वेळेवर दिली जात नाही. पहिले सिलिंडरच्या किमती २, ३ आणि ५ रुपये वाढत होते. परंतु आता ५० रुपये ६० रुपये अचानक एका रात्रीतून वाढतात. त्यामुळे गॅस सिलिंडर भरणे बंद केले आहे. पण लाकूड ही पहिल्यासारखे मिळत नाही." - शोभाबाई पवार (गृहिणी, बिजोरसे)