मधुमेह उपचारातील नव्या प्रवाहावर तज्ज्ञांचे मंथन

मधुमेह उपचारातील नव्या प्रवाहावर तज्ज्ञांचे मंथन
Published on: 
फोटो -16055 मालेगाव : स्टॉलवर औषधांविषयी विचारपूस करताना महिला. ---- ‘मधुकुंभ २०२६’ परिषदेत मधुमेह उपचारातील नव्या प्रवाहावर मंथन सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ७ : एम. बी. शुगर, मालेगाव, नाशिक डायबेटीस असोसिएशन, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स आणि इंडियन असोसिएशन ऑफ एंटरल ॲन्ड पॅरेंटरल न्यूट्रिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मधुकुंभ २०२६’ परिषद नाशिक येथे झाली. ‘मधुमेह : समाजातील गैरसमज’ या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. परिषदेला ३०० हून अधिक डॉक्टर व आरोग्यतज्ज्ञ उपस्थित होते. सीजीएम, एचबीएसी, जीएलपी-१ आधारित उपचार, कार्डिओ-डायबेटिस, कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲन्टी शुगर स्वीटनर्स आणि व्यायामाचे प्रिस्क्रिप्शन यांसह आधुनिक उपचारपद्धतींवर चर्चा झाली. ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. मिलिंद पारीपत्तेदार, सुनीत शहा, डॉ. अभय निकम, डॉ. संदीप कुलकर्णी, एनडीएचे अध्यक्ष डॉ. नितीन गैसास, डॉ. भाग्यश्री शिंदे, सचिव डॉ. पुष्कर देसाई, डायटिशियन क्षितिजा गायकवाड व पूजा शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद झाली. एम. बी. शुगरच्या ‘ॲन्टी शुगर’ उत्पादनाने तज्ज्ञांचे लक्ष वेधले. कंपनीच्या माहितीनुसार, रक्तातील साखर न वाढवता गोडवा मिळवून देणाऱ्या या उत्पादनाचे आधुनिक पॅकेजिंग योग्य प्रमाणात वापरासाठी उपयुक्त आहे. या वेळी कंपनीचे प्रतिनिधी डॉ. अजय पाटील, संजय महाले व दिग्विजय यांनी तज्ज्ञांशी संवाद साधला. मधुमेह नियंत्रणासाठी आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आधुनिक उपचार, तंत्रज्ञान आणि जीवनशैलीतील बदलांबाबत डॉक्टरांना अद्ययावत माहिती देणारी ही परिषद उपयुक्त ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com