पान चार मेन
------------------
दिवाळी तयारी मालिका
15072
नाशिक : महालक्ष्मी मूर्ती साकारताना मूर्तीकार.
महालक्ष्मी मूर्ती साकारण्याची कामे अंतिम टप्प्यात
बाजारात उत्साह ;कच्च्या मालाचे दर वाढल्याने दरांत वाढ
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.२७: दिवाळीनिमित्ताने महालक्ष्मी मूर्ती साकारण्याच्या कामे मूर्तिकारांकडून अंतिम टप्प्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने संपूर्ण कुटुंबीय मूर्ती साकारण्याच्या कामात व्यस्त झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या दरांत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मूर्तिकारांकडून देण्यात आली.
दिवाळी पर्वात लक्ष्मीपूजनास अतिशय महत्त्व आहे. आठ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन सण साजरा होणार आहे. यादिवशी महालक्ष्मी मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते. त्यानिमित्ताने महालक्ष्मी मूर्ती साकारण्याच्या कामास मूर्तिकारंकडून वेग देण्यात आला आहे. लक्ष्मीपुजनासाठी सहा इंचपासून ते सव्वाफूट मूर्ती साकारल्या जात आहे. १०० ते ६०० रुपयांपर्यंत मूर्तीचे दर आहेत.
शहरी भागात बहुतांशी ठिकाणी महालक्ष्मी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून लक्ष्मीपूजन केले जाते. तर काही जणांकडून अजूनही पूर्वजांची परंपरा कायम ठेवत महालक्ष्मी मूर्तींची स्थापना करूनच पूजा केली जाते. त्यानिमित्ताने अजूनही मोठ्या प्रमाणावर मुर्त्या साकारल्या जात असल्याचेही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तयार झालेल्या मुर्त्या नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून मूर्तिकारकांकडे मूर्तींची मागणी वाढली आहे.
-----
महागाईची झळ
महागाई, कच्च्या मालाचे वाढलेले दर, मजुरी तसेच इतर खर्चामध्ये वाढ झाल्याने मूर्तीच्या दरांमध्ये सुमारे २५ टक्के वाढ झाली असल्याची माहिती मूर्तिकारंकडून देण्यात आली. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून महालक्ष्मी मूर्ती विशेष मागणी आहे. आतापर्यंत ६० टक्के मूर्ती तयार झाल्या आहेत. उर्वरित ४० टक्के मूर्ती साकारण्याच्या कामात वेग आला आहे. पाच ते सहा दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मूर्ती दाखल होणार आहे.
............