Nashik News : महामार्ग बसस्थानकाचे रुप पालटणार! मॉल, शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट आदी सुविधा

mahamarg bus stand
mahamarg bus standesakal

Nashik News : शहरातील मुंबई नाका परिसरातील महामार्ग बसस्थानकाचे लवकरच आधुनिकीकरण होणार असून यात अनेक सुविधा , व्यापारी जागा, शॉपिंग मॉल होणार असल्याने स्थानकाचे रूपच बदलणार आहे.

प्रायव्हेट पार्टनर तत्त्वावर हे आधुनिकीकरण होणार आहे. (mahamarg bus station will change Mall shopping center restaurant etc facilities Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

mahamarg bus stand
MPSC Combined Prelims Exam : एमपीएससी संयुक्‍त पूर्व परीक्षेच्या पेपराची काठीण्य पातळी सौम्‍य

महामंडळाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेत खासदार हेमंत गोडसे यांनी महामार्ग बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाची मागणी केली होती., महामंडळाचे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय, मॉल, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर, प्रवाशांसाठी वातानुकूलित वेटिंग रूम, पुरुष आणि महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र रांगा, शौचालये आदी आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोकण, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर, तुळजापूर, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणांसाठी नाशिक शहरात रोज बसने सुमारे वीस हजार प्रवाशी ये-जा करत असतात, त्यामुळे या गर्दीला सुविधांसाठी आधुनिकीकरणाचा विषय पुढे आला आहे.

याबाबतचे डिझाईन वजा नकाशा श्री. गोडसे यांनी जैन यांच्याकडे सादर केले आहेत. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीकडून महामार्ग बसस्थानकाचे विकसन करून प्रायव्हेट पार्टनर (पीपीपी) तत्त्वावर चालविणे सहज शक्य होणार असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.

mahamarg bus stand
MUHS Summer Internship Program: आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे समर एंन्‍ट्रन्‍सशिपचा प्रोग्रॅम; ही आहे मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com