नाशिक- राज्य शासनाच्या ‘तालुका तिथे बाजार समिती’ या धोरणांतर्गत सहकार विभागाने मुंबई उपनगर वगळता राज्यात ६५ ठिकाणी नवीन बाजार समित्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी तसेच विदर्भातील गडचिरोली आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक बाजार समित्या उभारण्यात येतील. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर व पेठ येथे नवीन बाजार समित्यांसाठी जागेचा शोध सुरू झाला आहे.